तात्या लांडगे : सोलापूर- उन्हाळा असो की पावसाळा हाती खुरपे, कुदळ घेऊन किंवा डोक्यावर माती, दगडाने भरलेली पाटी घेऊन काबाडकष्ट करणारी हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील ‘ती’ आता स्वावलंबी झाली आहे. राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सहा लाख ५३ हजार बचतगटांच्या माध्यमातून ६४ लाख ८३ हजार महिला आर्थिक स्वावलंबी झाल्या असून दरवर्षी १५० कोटींची त्या बचत करत आहेत. त्यात २६ लाख महिला ‘लखपती दीदी’ आहेत. कोरोनाच्या संकटानंतर राज्यात एक लाख बचतगट वाढले असून त्यातून दहा लाख महिला नव्याने जोडल्या गेल्या आहेत.