गॅसटॅंकर उलटला अन्‌ खेडीवासीयांचा ठोका चुकला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

खेडी गावाजवळच गॅसने भरलेला टॅंकर उलटल्याची माहिती गावकऱ्यांसह एमआयडीसी परिसरात मिळाली. काहींनी घटनास्थळ गाठले मात्र टॅंकर भरलेला असल्याची माहिती मिळताच त्यांनीही धूम ठोकली. पोलिस आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परिसराचा ताबा घेत रेस्क्‍यू ऑपरेशन राबवले.

 

जळगाव, :- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी आठ वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने एलपीजी, गॅसभरलेला टॅंकर चालकाचा ताबा सुटून विद्युत खांबाला धडकताच उलटून कडुलिंबाच्या झाडावर जाऊन आदळला. ट्रक पासून गॅस टाकी विलग होऊन महामार्गाच्या बाजूला कोसळली. गॅस लिक होऊन स्फोट घडण्याच्या भीतीने चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच खेडी वासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

जळगाव-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी मुंबईकडून आलेला गॅस टॅंकर क्र. (एमएच.43वाय.9801) वरील चालकाचा ताबा सुटल्याने टॅंकर विद्युत खांबाला जाऊन आदळला. या अपघातात टॅंकरचे पिनीयन जॉइंट तुटल्याने टॅंकर ट्रक पासून विलग होऊन रस्त्याच्या 
ा कडेला कोसळले. दुर्घटना घडताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेचे वृत्त कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी, भूषण सोनार अशांनी घटनास्थळी धाव घेतली. भारत गॅस कंपनीचे मनोज वर्मा यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी त्यांच्या आपत्कालीन अग्नी अवरोधक यंत्रसामग्रीने सुसज्जीत टिमसह टॅंकरला घेराव घातला. दीड तास टॅंकरची तपासणी करण्यात आल्यावर टॅंकर हटविण्याचे कामसुरु होते. चालकाची माहिती काढून एमआयडीसी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत अपघाताची माहिती त्याच्याकडून जाणून घेण्यात आली. या प्रकरणी अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिसांत करण्यात आली आहे. 

गावात भीतीचे वातावरण 
खेडी गावाजवळच गॅसने भरलेला टॅंकर उलटल्याची माहिती गावकऱ्यांसह एमआयडीसी परिसरात मिळाली. काहींनी घटनास्थळ गाठले मात्र टॅंकर भरलेला असल्याची माहिती मिळताच त्यांनीही धूम ठोकली. पोलिस आणि गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परिसराचा ताबा घेत रेस्क्‍यू ऑपरेशन राबवले. 

टॅंकर पूर्ण क्षमतेने भरलेले 
राष्ट्रीय महामार्गावर खेडी गावाजवळ उलटलेल्या गॅस टॅंकर मुंबईहून जळगावी आले होते, त्यात सुमारे 8 ते 10 लाख रुपये किमतीचे (7.5 MT ,12.5 MT, 18 MT, 21MT ) वजनी स्वयंपाक गॅस भरलेले होते. परिणामी अपघात घडताच चालकाने स्फोटाच्या भीतीने धूम ठोकली. या गॅस टॅंकरचा स्फोट झाला असता तर कदाचित खेडी परिसरात एक किलोमीटर परिघात होत्याचे नव्हते झाले असते, याची जाणीव जाणकारांना असल्याने त्यांनी तातडीने उपाय योजना प्रारंभ केल्या. 4-5 तासांच्या परिश्रमानंतर टॅंकर उचलण्यात यश आले. 
----------पूर्ण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gais tankar accident on jalgaon highway