जामनेर- तालुक्यातील केकतनिंभोरा येथे सकाळी इयत्ता दहावीचा विद्यार्थी गजानन याच्या वडिलांना अकस्मात मृत्यूने गाठले. सगळे वातावरण शोकाकुल बनले. आई, वडील भाऊ, आणि नातेवाईक यांच्यासह त्याच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण दहावीची परीक्षा सुरू असल्याने मुलाने मनावर दगड ठेवून धैर्याने विद्यार्थ्याचे कर्तव्य बजावत दहावीचा पेपर दिला.