Dhule News : पाचकंदील परिसरात महापालिका व्यापारी संकुल उभारणार : गजेंद्र अंपळकर

Dhule municipal corporation news
Dhule municipal corporation newsesakal

Dhule News : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि मुख्य बाजारपेठेच्या पाचकंदील परिसरातील पाचही मार्केटचे जुने बांधकाम पाडून त्या जागी अद्ययावत व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केला आहे.

त्यांच्या प्रयत्नांना महापालिका प्रशासनाने साथ देत पाचकंदील परिसराचा कायाकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजगारासह अतिक्रमणासंबंधी प्रश्‍नाची तीव्रता कमी होईल, असा विश्‍वास श्री. अंपळकर यांनी व्यक्त केला.(Gajendra Ampalkar statement of Municipal business complex set up in Pachkandil area dhule news)

पाचकंदील परिसरातील जुन्या पाचही मार्केटप्रश्‍नी आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी श्री. अंपळकर यांना पत्र दिले आहे. त्यानुसार पाचकंदील परिसरात छत्रपती शिवाजी मार्केट, जय शंकर मार्केट, लालबहादूर शास्त्री भाजीपाला मार्केट, फ्रूट मार्केट व धान्य मार्केट आहे.

ते वर्दळीच्या पाचकंदील परिसरातील मुख्य बाजारपेठेत आहेत. या भागात शहरासह जिल्ह्यातून येणारे ग्राहक, चाकरमाने, फेरीवाल्यांमुळे कायम गर्दी असते. त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी, अतिक्रमणांचा प्रश्‍न ऐरणीवर असतो.

प्रश्‍नावर विशेष समिती

परिणामी, आग्रा रोडवरील व्यापारी, दुकानदारांनी लाखो रुपये खर्चून उभारलेली मालकीची दुकाने निष्प्रभ ठरतात. त्यांची आलिशान दुकाने, शोरूमसमोर फेरीवाले व्यवसाय थाटतात. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्‍न निर्माण होतो. या संदर्भात वर्षानुवर्षे तक्रारी, आंदोलने होत असतात; परंतु याप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, वेळोवेळी झालेल्या मागणीनुसार तोडगा निघण्यासाठी नगरविकास विभागाने १९ एप्रिल २०१७ ला नाशिक विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली. त्यात २८ ऑगस्ट २०१७ ला चारही मार्केटचे एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले गेले.

Dhule municipal corporation news
Dhule News: विहीर नसतानाही सातबाऱ्यावर नोंद; शेतकऱ्यांपुढे अडचण

भाजपमुळे आशा पल्लवित

असे असताना सहा वर्षांपासून हा प्रश्‍न भिजतच पडला होता. त्यास भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अंपळकर यांनी चालना देण्यास सुरवात केली.

त्यांनी पाचकंदील भागातील या पाचही मार्केटसह व्यापारी, दुकानदारांचा हा प्रलंबित प्रश्‍न भाजप महायुती सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच कायमस्वरूपी मार्गी लागेल, संकल्पानुसार पाचकंदील परिसरात अद्ययावत सर्व सोयी-सुविधांयुक्त व्यापारी संकुल उभे राहील, अशा निर्धारासह विश्‍वास व्यक्त केला.

आयुक्तांचा प्रतिसाद

श्री. अंपळकर यांच्या पाठपुराव्यावर आयुक्त दगडे-पाटील यांनी पत्रात म्हटले आहे, की जुने पाच मार्केट नव्याने बांधणे आणि श्री. अंपळकर यांच्या ३१ ऑक्टोबरच्या पत्रातील सर्व मुद्द्यांचा सखोल विचार करता शहरात सुसज्ज व्यापारी संकुल उभारणे, शहरातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्याकामी बांधकाम आराखडे तयार करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, शहरात प्रस्तावित पाचकंदील मार्केट बांधकामाचे प्रकरण गाजत आहे. यात पूर्वीच्या ठेकेदाराने काम झाले नसताना महापालिकेवर ३० कोटी रुपये आणि अधिक व्याजाचा दावा ठोकला आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाने लवादासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी ठेकेदारावर मनपा नुकसानभरपाईचा दावा ठोकणार असल्याचे आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.

Dhule municipal corporation news
Dhule News : प्रदूषणप्रश्‍नी निर्देश; कचरा, राडारोडाबाबत दंड

महापालिका प्रशासनाकडून अपेक्षा

प्रतिक्रिया देताना श्री. अंपळकर म्हणाले, की महापालिकेने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून महापालिकेचे पर्यायाने धुळेकरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रस्तावित जागेतील जुन्या गाळेधारकांना सवलतीच्या दराने गाळे-ओटे दिले जावेत. बेरोजगारांना सामावून घेत रोजगार दिला पाहिजे.

प्रस्तावित आराखड्यात पार्किंग, महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, पाणी, कचरा विल्हेवाट, अग्निरोधक यंत्रणा आदी सुविधा उपलब्धतेची काळजी महापालिकेने घ्यावी. याकामी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे पाठबळ असून, भाजपचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Dhule municipal corporation news
Dhule News : मनपा सदस्य चौधरींकडून प्रश्‍नांची मांडणी; पाणीप्रश्‍नी मनुष्यबळाला मंजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com