अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक

प्रमोद सावंत
बुधवार, 15 मे 2019

मालेगाव शहरातील दानीश पार्क परिसरातील मुलीवर झाला अत्याचार.

- अत्याचाराचे करण्यात आले चित्रिकरण.

मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

येथील 17 वर्षीय तरुणीला शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीने 'कुराण शरीफ के दौरे के लिए मेरे साथ चल' असे सांगून सुन्नी मदरसा इदगाहजवळ नेले. तेथे या मैत्रिणीच्या शेजारी राहणारा तरुण अब्दुल मजीद एकबाल अहमद (वय २२) हा दुचाकीवर उभा होता. त्याने दोघा तरुणींना दुचाकीवर बसवून दानीश पार्क भागातील मोहंमद निजामुद्दीन अब्दुल अजीज (२४) याच्या घरी नेले. हे घर सईद वायरमन नामक मालकाचे होते. निजामुद्दीन भाडेतत्वावर तेथे राहत होता. कोणीतरी सईदला तुझ्या घरी दोन तरुण मुली गेल्याचे सांगितले. त्यावेळी सईदही या घरी पोहोचला.

सईदने संबंधित तरुणीवर अत्याचार केला. दोघा तरुणांनी मुलींसमवेत झालेले संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केले. पीडित तरुणीला आपल्या मैत्रिणीने फूस लावून येथे आणले. फसवणूक व अत्याचार झाल्याचे लक्षात आले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन अब्दुल मजीद, मोहंमद निजामुद्दीन, सईद वायरमन व तिची मैत्रिण या चौघांविरुध्द पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी अब्दुल मजीद व निजामुद्दीनला अटक केली असून, सईदचा शोध सुरु आहे. ऐन रमजान पर्वात हा अत्याचाराचा प्रकार घडल्याने व संबंधित चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पूर्व भागात खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang Rape on Minor Girl in Malegaon Two Arrested