भुसावळ- येथील पालिकेकडून शहरातील मुख्य मार्ग व गल्लीबोळासह दुकाने व घराघरांतील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दारोदारी फिरत असतानाही उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. घरातील कचरा दररोज घंटागाडीतच टाकणे बंधनकारक आहे. रस्त्यावर कचराकुंड्या ठेवणे, हे शासनाच्या विचाराधीन नसल्याचे पालिका सांगते. दुसरीकडे मक्तेदार रस्त्यावरील कचरा उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शहरात ओंगाळवाणे चित्र निर्माण झाले असून, ओसांडणाऱ्या कचराकुंड्यांमधील कचरा उचलणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.