Dhule News : शिंदखेडा शहरात उद्यान ठरतेय कुतूहलाचा विषय; घराभोवती निर्माण केला ‘स्वर्ग’

Grandparents relaxing and chatting in their self-made garden.
Grandparents relaxing and chatting in their self-made garden.esakal

Dhule News : घराच्या मोकळ्या जागेत बांधकामाच्या उरलेल्या विटांचा व दगडांचा खच, आजूबाजूला झाडझुडपे वाढून झालेले घाणीचे साम्राज्य हे बघून घरातील वयोवृद्ध आजींना अस्वस्थ वाटत होते.

त्यांनी मनात चंग बांधून बघता बघता या मोकळ्या जागेचे वातावरण बदलून चार वर्षांच्या अथक प्रयत्नाने टाकाऊ वस्तूंचा वापर करून सुंदर गार्डन तयार केले.(garden made by grandparents is becoming subject of curiosity in Sindkheda city dhule news)

आजीबाईंचे हे गार्डन शहरात कुतूहलाचा विषय होऊन हे युवक-युवतींचे सेल्फी पॉइंट झाले आहे. ८५ वर्षे वय असलेल्या या आजीबाईंचे नाव आहे, जिजाबाई दिनकर पाटील. आजीबाई आता पती व कुटुंबासह गार्डनमध्ये आपला निवांत वेळ घालवतात.

शिंदखेडा येथील पोलिस ठाणे रोड परिसरातील एसएसव्हीपीएस कॉलेजसमोरील कॉलनीत दिनकर तोताराम पाटील (वय ९२) पत्नी जिजाबाई व कुटुंबासह येथे राहतात. तीन हजार २०० स्क्वेअरफुटांच्या प्लॉटमध्ये सोळाशे स्क्वेअर फूट जागेत प्लॉट बांधून उरलेल्या मोकळ्या जागेत सुंदर गार्डन तयार करण्याच्या विचाराला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू केला.

घरातील टाकाऊ वस्तू व बाहेरून विविध रोपे आणून बगीचा तयार करण्यास सुरवात केली. घरातील पती आणि मुलांच्या सहकार्याने बघता बघता सुंदर गार्डन तयार झाले.

गार्डनमध्ये विविध प्रकारची फुलझाडे आहेत. झुले, छोटीशी झोपडी, लहान मुलांना खेळण्यासाठी काल्पनिक रेल्वे ट्रॅक, टाकाऊ टायरपासून बनविलेली विहीर, विविध ठिकाणी बसविलेले झुले, महादेवाची पिंडी, गार्डनच्या मधोमध असलेली गौतम बुद्धांची मूर्ती, पाण्याचे कारंजे आहेत.

जिजाबाई पाटील.
पंचाऐंशीवर्षीय आजीबाईंनी तयार केलेले गार्डन.
जिजाबाई पाटील. पंचाऐंशीवर्षीय आजीबाईंनी तयार केलेले गार्डन.esakal
Grandparents relaxing and chatting in their self-made garden.
Dhule News : ग्रामीण रुग्णालयासाठी एक कोटी; नागपूर अधिवेशनातून तरतूद

चारचाकीचे जुने टायर, सायकलचे जुने टायर, लहान मुलांची घरातील जुनी खेळणी, नातीची बाहुली, घराच्या बांधकामाच्या उरलेल्या विटा, दगड, फरशीचे तुकडे, पेव्हर ब्लॉकचे तुकडे, कामात न येणारे नळाचे पाइप, लोखंडी अँगल, दोर, तार, जुन्या प्लॅस्टिकच्या बादल्या, तगारी, दगड, धोंडे, गोटे आदी टाकाऊ वस्तूंचा यात समावेश आहे.

पक्ष्यांचा रहिवास अन् सेल्फी पॉइंट

टाकाऊ वस्तूंचा वापर व योग्य प्रकारची रंगसंगती यामुळे गार्डन अतिशय आकर्षक झाले आहे. गार्डनमध्ये असलेल्या वृक्षांवर विविध पक्ष्यांचा रहिवासदेखील वाढला आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिवाराचा दिवस सुरू होतो. हे गार्डन शहरात कुतुहलाचा विषय आहे. गार्डन पाहण्यासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनीदेखील भेट दिली होती. आजींनी तयार केलेले गार्डन शहरातील महाविद्यालयांतील युवक-युवतींचे सेल्फी पॉइंट झाले आहे.

ज्या वयामध्ये आरामात आयुष्य व्यतीत करायचे त्या वयात जिजाबाईंनी आपल्या घराभोवती गार्डन तयार केले. रोज सकाळी उठून त्या गार्डनची स्वच्छता करतात. टुमदार असे घर असावे आणि घराच्या भोवती गार्डन असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न आजींनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविले.

Grandparents relaxing and chatting in their self-made garden.
Dhule News : वादानंतर निकम ‘कंट्रोल रूम’ला; प्रलंबित कसुरी अहवालाची दखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com