esakal | गिरीश महाजन शहराच्या राजकारणात सक्रिय... 
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan 1111.jpg

22 नोव्हेंबरला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. त्यापूर्वी बहुमत नसले तरी माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवक संपर्कात आल्याने, तसेच राज्यात शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडीचे नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येत असल्याने तोच ट्रेन नाशिक महापालिकेत निर्माण होऊ शकतो या शक्‍यतेने भाजपला सत्तेपासून सहज रोखता येणे शक्‍य असल्याचा विश्‍वास शिवसेनेला निर्माण झाला आहे.

गिरीश महाजन शहराच्या राजकारणात सक्रिय... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक महापालिकेमध्ये भाजपचे बहुमत असले तरी दहापेक्षा अधिक नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने निर्माण झालेल्या अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सत्ताकारणात गुंतलेले माजी मंत्री गिरीश महाजन व भाजपचे संघटनमंत्री किशोर काळकर शहराच्या राजकारणात सक्रिय झाले. काळकर शनिवारपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. महाजन सावंतवाडी येथे पोचलेल्या भाजप नगरसेवकांच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. 

भाजपमधील सुंदोपसुंदीचा परिणाम  
22 नोव्हेंबरला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. त्यापूर्वी बहुमत नसले तरी माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवक संपर्कात आल्याने, तसेच राज्यात शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडीचे नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येत असल्याने तोच ट्रेन नाशिक महापालिकेत निर्माण होऊ शकतो या शक्‍यतेने भाजपला सत्तेपासून सहज रोखता येणे शक्‍य असल्याचा विश्‍वास शिवसेनेला निर्माण झाला आहे. भाजपचे काही नगरसेवक शिवसेना खासदार संजय राऊत यांना भेटल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे फाटाफूट होण्याच्या भीतीने शनिवारी भाजप नगरसेवकांची सहल काढण्यात आली. अद्यापही काही नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने माजी मंत्री गिरीश महाजन व भाजप संघटनमंत्री किशोर काळकर शहराच्या राजकारणात सक्रिय झाले. काळकर यांनी रविवारी दिवसभरात संपर्कात नसलेल्या नाशिक रोडमधील दोन नगरसेवकांची भेट घेतली. महापौरपदाची निवडणूक होईपर्यंत ते नाशिकमध्ये थांबून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहेत. तर महाजन नगरसेवकांच्या कॅम्पमध्ये दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

48 नगरसेवक कॅम्पमध्ये दाखल 
पुणे येथील मुक्काम रविवारी सकाळी हलवत भाजप नगरसेवक कोकणात दाखल झाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेखाली हे नगरसेवक असल्याचे समजते. संपर्कात असलेल्या सर्वच नगरसेवकांना तातडीने नेत्यांमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने सायंकाळपर्यंत 48 नगरसेवक कॅम्पमध्ये जमल्याचे समजते. नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित होणार आहे.