VIDEO : शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे गिरीश महाजन..पाहा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

शेतक-यांना  १०० टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी गिरीश महाजनांच्या नुकसान पाहणी दौऱ्यावेळी पाहायला मिळाली. यावेळी पिंपळगावमध्ये गिरीश महाजन यांनी केली द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी करून सरकारकडून मदतीचे आश्वासन महाजन यांनी दिले. गावोगावी कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी पंचनामे करत असून, त्यांना माहिती देताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटत आहे.

नाशिक : गिरीश महाजनांच्या नाशिकमधील नुकसान पाहणी दौऱ्यावर असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत ओझरमध्ये बैठक पार पडली. यावेळी बैठकीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्या रोषाला महाजनांना सामोरे जावे लागले. पिकांचे पंचनामे आणि नुकसानभरपाई मिळण्यासह कर्जवसुली तातडीने थांबवावी या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर येत्या दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे महाजनांनी आश्वासन दिले.-

शेतक-यांना  १०० टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी महाजनांच्या नुकसानपाहणी दौऱ्यावेळी पाहायला मिळाली. यावेळी पिंपळगावमध्ये गिरीश महाजन यांनी केली द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी करून सरकारकडून मदतीचे आश्वासन महाजन यांनी दिले.गावोगावी कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी पंचनामे करत असून, त्यांना माहिती देताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटत आहे.

सर्वत्र कहर माजविलेल्या अवकाळी पावसाने शेतीला तडाखा दिला असून, शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला आहे. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे उत्पन्नात तब्बल नुकसान होत आहे.अल्प पावसाअभावी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा खिळखिळा झाला आहे. अशात सुरवातीला खरीप हंगाम रिमझिम पावसावर सुरू केला पण मध्यंतरी पावसाने कृपा केल्याने या वेळी मका, सोयाबीन, कपाशी व कांदा जोमात आल्याने यंदा आबादानी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या दोन महिन्यांत वेळोवेळी पाऊस व पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तनही दोन महिने चालल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन खरिपासोबत रब्बीचा आशावाद जागा झाला असताना नियतीने बळीराजाच्या या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शेतातील नासाडी झालेल्या पिकाकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत आहे. 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan faces farmers' anger