esakal | VIDEO : सेनेसोबतच्या वाटाघाटीतून तोडगा निघेल..सत्तास्थापनेसंदर्भात पाहा काय म्हणाले गिरीश महाजन
sakal

बोलून बातमी शोधा

GIRISH MAHAJAN1.jpg

सत्तास्थापनेसंदर्भात शनिवार (ता.9)  तारखे पर्यंत वेळ आहे, त्या वेळेपर्यंत सेनेसोबतच्या वाटाघाटीतून तोडगा निघेल. तसेच मुख्यमंत्री एकटे नाहीत, संपूर्ण भाजप पक्ष त्यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादी सेना एकत्रित सत्ता स्थापन संदर्भात माहिती नाही मात्र सध्या पक्षाची वेट अँड वॉचची भूमिका असून लवकरच चित्र स्पष्ट होईल. असे राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

VIDEO : सेनेसोबतच्या वाटाघाटीतून तोडगा निघेल..सत्तास्थापनेसंदर्भात पाहा काय म्हणाले गिरीश महाजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नाशिक :  सत्तास्थापनेसंदर्भात शनिवार (ता.9)  तारखे पर्यंत वेळ आहे, त्या वेळेपर्यंत सेनेसोबतच्या वाटाघाटीतून तोडगा निघेल. तसेच मुख्यमंत्री एकटे नाहीत, संपूर्ण भाजप पक्ष त्यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादी सेना एकत्रित सत्ता स्थापन संदर्भात माहिती नाही मात्र सध्या पक्षाची वेट अँड वॉचची भूमिका असून लवकरच चित्र स्पष्ट होईल. असे राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपचाच मुख्यमंत्री असेल असा विश्‍वास
काल (ता.२) जळगावमध्ये बोलताना राज्यातील राजकीय स्थितीबाबत ते म्हणाले, मुदतीपर्यंत राज्यात सरकार निश्‍चित स्थापन होईल. राज्यात युतीचेच सरकार येईल व भाजपचाच मुख्यमंत्री असेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते संजय राऊत करीत असलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले,संजय राऊत बोलत आहेत. आम्ही केवळ ऐकत आहोत. त्यांच्या वक्तव्यावर आम्ही केवळ वेट ऍड वॉचची भूमिका घेतली आहे.