Girish Mahajan: मागचे काय यापेक्षा पुढे चांगले काम करा : मंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan guiding the workers along with corporators in Dhule. In the second photo, MP Dr. Subhash Bhamre and Minister Mahajan.
Minister Girish Mahajan guiding the workers along with corporators in Dhule. In the second photo, MP Dr. Subhash Bhamre and Minister Mahajan.esakal
Updated on

Girish Mahajan : खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे कट्टर समर्थक गजेंद्र अंपळकर यांची भाजपच्या धुळे शहर-जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली. यानंतर त्यांनी खासदारांच्या साथीने जामनेर (जि. जळगाव) येथे चार दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले.

त्या वेळी आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला ‘५० प्लस’ जागा मिळवून देऊ, असा संकल्प श्री. अंपळकर यांनी सोडला.

त्याच वेळी धुळ्यात मागे काय झाले... यापेक्षा पुढे आणखी चांगले काम कसे होईल यावर भर ठेवावा, अशी सूचना देत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या उद्‌घाटनाची तारीख लवकर कळवा, असेही मंत्री महाजन म्हणाले. (Girish Mahajan statement Do better ahead than behind dhule news)

खासदार डॉ. भामरे, शहर-जिल्हाध्यक्ष अंपळकर यांच्यासह सरासरी ७० हून अधिक वाहनांद्वारे समर्थकांनी जामनेर गाठले. त्यात भाजपचे येथील ३० ते ३२ नगरसेवक व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रामुख्याने माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, अनिल नागमोते, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक हिरामण गवळी, हर्षकुमार रेलन, वंदना भामरे, सुरेखा उगले, चेतन मंडोरे, बंटी मासोळे, संजय पाटील,

प्रवीण अग्रवाल, दगडू बागूल, बबन देवरे, राजेश पवार, नरेश चौधरी, गोपीचंद पाटील, रंगादादा ठाकरे, विजय जाधव, संतोष खताळ, राजू सोनवणे, प्रशांत बागूल, भारती माळी, आरती पवार, मंगला पाटील, पुष्पा बोरसे,

वंदना थोरात, सुरेखा उगले, सुरेखा देवरे, वैशाली शिरसाट, मंजूषा लोहारीकर, ललिता थोरात, मोहिनी धात्रक, रंजना पाटील, उमा कोळवले, संगीता राजपूत, प्रिया कपोले आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Minister Girish Mahajan guiding the workers along with corporators in Dhule. In the second photo, MP Dr. Subhash Bhamre and Minister Mahajan.
Nashik News: आदिवासी विकास सोसायट्यांच्या अनुदान प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत

उद्‌घाटनाची तारीख कळवा

खासदार डॉ. भामरे यांनी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेविषयी माहिती दिली. शेवटच्या टप्प्यातील या योजनेत वीज कंपनीकडून अपेक्षित ते काम सुरू असून, पाणीपुरवठ्याची चाचणी, तपासणी सुरू असल्याचे सांगत ही योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावर मंत्री महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही पाठपुराव्यातून निधी उपलब्ध करून दिल्याने अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना केव्हा सुरू होईल आणि कुठल्या तारखेला मी उद्‌घाटनाला येऊ, अशी थेट विचारणा केली.

त्यावर लवकरच गोड बातमी देऊ व १५ ऑगस्टपर्यंत योजना सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.

जे झाले ते झाले...पुढे चांगले काम करा

श्री. अंपळकर यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी सार्थ ठरवून धुळे शहराचा चेहरामोहरा बदलवून दाखवेन, आगामी निवडणुकीत पक्षाला सर्वांच्या साथीने ५० प्लस जागा मिळवून देऊ, जनहितासह पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी अहोरात्र झटेन, अशी ग्वाही मंत्री महाजन यांना दिली.

त्या वेळी मंत्री महाजन यांनी मागे काय झाले यापेक्षा पुढे आणखी चांगले काम करा, असा सूचनावजा सल्ला दिला.

Minister Girish Mahajan guiding the workers along with corporators in Dhule. In the second photo, MP Dr. Subhash Bhamre and Minister Mahajan.
Lakshmi Yojana: सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव! लक्ष्मी योजनेची अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com