जळगाव- जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १२० पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहिले. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नदी-नाल्यांमध्ये जलप्रवाह सुरू होता. परंतु आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणामुळे वाढला.