जळगाव- जिल्ह्यातील तापमानाने आता चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. दुसरीकडे जलसिंचन प्रकल्पांमधील साठेही कमी होऊ लागले आहेत. गिरणा धरणातील साठा ५१.८७ टक्के शिल्लक आहे; तर हतनूर धरणात ७०.५९ टक्के, वाघूर ८६.९३ टक्के एवढा आहे. गिरणा धरणावर पूर्ण चाळीसगाव पट्टा अवलंबून आहे.