जळगाव- अक्षयतृतीयेला सोन्याचा भाव जीएसटीसह ९८ हजार ६७४ प्रतिदहा ग्रॅम होता. उच्चांकी भावाने सोने विक्रीत २० टक्के घट झाली होती. याचा परिणाम म्हणून शुक्रवारी (ता. २) सोन्यात भावात दोन हजार ४०० रुपयांची घसरण झाली, तर चांदीही एक हजार रुपयांनी खाली आली. गेल्या चार दिवसांतील हे चित्र आहे.