Vidhan Sabha 2019 : सरकार जाती, धर्म व झुंडशाहीवर चालत नाही - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सरकार जाती धर्म व झुंडशाहीवर चालत नाही, भाजप सेनेच्या कार्यकाळात शेतकरी मेटाकुटीला आला, कारखाने बंद झाले, बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, सरकारचे नियोजन शून्य कारभारा बरोबरच शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा घाट या सरकारने घातला., बहुजन नेत्यांची उमेदवारी रोखून आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेणारे काय? तरुणांनी व सुज्ञ मतदारांनी कामाला लागा असा आदेश माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथील प्रचार सभेत दिला.

घोटी : सरकार जाती धर्म व झुंडशाहीवर चालत नाही, भाजप सेनेच्या कार्यकाळात शेतकरी मेटाकुटीला आला, कारखाने बंद झाले, बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, सरकारचे नियोजन शून्य कारभारा बरोबरच शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा घाट या सरकारने घातला., बहुजन नेत्यांची उमेदवारी रोखून आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेणारे काय? असा प्रश्न विचारत मतदारानो विकासाचे स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या जनतेने सेना भाजप सरकारला नेस्तनाबूत करून काँग्रेस राष्ट्रवादी व समविचारी पक्षांच्या उमेदवारांना  निवडून द्या, पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तरुणांनी व सुज्ञ मतदारांनी कामाला लागा असे आदेश माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथील प्रचार सभेत दिले.

अशोक मुर्तडक यांची माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा - भुजबळ

नाशिक पूर्व मधून अशोक मुर्तडक यांची माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार असे देखील भुजबळ म्हणाले. पूर्व मधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची माघार घेण्याचा निर्णय आज घेतला.  मुर्तडक यांच्या माघारीमुळे पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले व भाजपमधून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आमदार बाळासाहेब सानप यांच्या थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

भ्रष्टचार व घराणेशाही जोपासणा-या व उमेदवारी करणाऱ्यांना धडा शिकवा
हिरामण खोसकर आपल्या भाषणात म्हणाले की, भ्रष्टचार व घराणेशाही जोपासणा-या व उमेदवारी करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन त्यांनी करत छगन भुजबळ व पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तयार रहा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर,प्रदेश सरचिटणीस अँड संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव,शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ पागेरे,तानाजी झाडे,अरुण भोर,माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके,जनार्धन माळी,माजी सभापती गोपाळा लाहंगे,डॉ. भारती भोये,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष रामदास धांडे,फिरोज पठाण,वसंत मुसळे,उत्तम भोसले, अरुण गायकर ,निवृत्ती महाले,दिलीप खेटे, दिनकर मोरे,बाळासाहेब कुकडे उपस्थित होते. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठयसंख्येने यावेळी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government does not run on caste religion and fanaticism - chagan Bhujbal