
शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. अनेक ठिकाणी भाजपची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने ग्रामपंचायती काबीज केले आहेत.
चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यात 48 ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला यात शिवसेनेचे 11 ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवून भगवा फडकविला आहे. तालुक्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंधरा ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.
आवश्य वाचा- मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी लढवली शक्कल; सतर्क पोलिसदादाला कळताच, पुढे घडले असे !
तालुक्यात सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून भाजपचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये यंदा शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. अनेक ठिकाणी भाजपची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने ग्रामपंचायती काबीज केले आहेत. पडावद ,डाबली ,दिवी , महाळपुर दसवेल , जातोडा, अक्कडसे , खलाणे, डांगुर्णे - सोंडले व धावडे या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
आवर्जून वाचा- तृतीयपंथीची विजयी कथा; अर्ज ठरविला होता बाद, पण न्यायालयालचा दिलासा आणि 'अंजली' लढली
शिवसेनेची एन्ट्री
तसेंच तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून चौगाव, बेटावद, दलवांडे (प्र नंदुरबार), दरखेडा , दसवेल , जखाणे हुंबर्डे, जसाणे , लोहगाव - वसमाने, मुडावद, वरूळ - घुसरे व विरदेल ग्रामपंचायतीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माध्यमातून शिवसेनेने तालुक्यात एन्ट्री केली आहे. सर्व निवडून आलेल्या सदस्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल सोनवणे, शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख हेमंतराव साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख गिरीश देसले यांनी अभिनंदन केले.
संपादन- भूषण श्रीखंडे