Dhule Job Fair : धुळ्यात या तारखेला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन! | grand job fair was organized on June 11 dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Job Fair : धुळ्यात या तारखेला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!

Dhule Job Fair : धुळ्यात या तारखेला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!

Dhule Job Fair : माजीमंत्री रोहिदास पाटील यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त आमदार कुणाल पाटील यांच्या संकल्पनेतून धुळ्यात ११ जूनला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याद्वारे एकूण पन्नास पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये सुमारे पाच हजार तरुणांना हक्काचा रोजगार मिळणार आहे. ( grand job fair was organized on June 11 dhule news )

वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेता धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमदार श्री. पाटील यांनी धुळ्यात ११ जूनला (रविवार) सकाळी नऊला येथील नॉर्थ पॉइंट स्कूल देवपूर धुळे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमार्फत मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

त्यातून तब्बल पाच हजार तरुणांना हक्काचा रोजगार मिळणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स व मार्केटिंग, बँकिंग इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, टेलिकॉम व इतर आयटी., बिपीओ/केपिओ, फार्मा अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासाठी आठवी ते बारावी, बी.ए., एम.ए., बी.कॉम, एम.कॉम., बी.एस्सी, एम.एस्सी., बीसीए, एमसीए, बीबीए, एमबीए, आयटीआय, बी.ई., डिप्लोमा यास सर्व शैक्षणिक क्षेत्रातील पदवी, पदवीधर या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहू शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी अर्ज धुळे तालुक्यात प्रत्येक गावात उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच नॉर्थ पॉइंट स्कूल देवपूर, धुळे येथेही अर्ज उपलब्ध होतील.

मेळावापूर्व मार्गदर्शन

रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने १० जूनला सकाळी दहा ते सायंकाळी पाचदरम्यान धुळे शहरातील हिरे भवन (स्टेशन रोड) येथे रोजगार मेळावापूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मुलाखतीचे तंत्र, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीला जाण्याअगोदर करावयाची तयारी आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

हे मार्गदर्शन शिबिर मोफत असून बेरोजगार युवक-युवतींसाठी खुले असणार आहे. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी भूषण पाटील (मो.९८५०६४४००४), शरद पाटील मो.९७६५०७०००१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोजगार मेळाव्याचे मुख्य समन्वयक विशेष कार्याधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे.