चाळीसगाव- महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी नाशिक येथील अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १८) ज्या तीन दुकानदारांकडे छापा टाकला होता. त्याचे बुधवारी (ता. १९) पंचासमोर पंचनामे करून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी अटक केलेल्या तिन्ही दुकानदारांना न्यायालयात हजर केले असता, तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.