Dhule Crime News : शिरपूरजवळ 20 लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांची कारवाई | Gutkha worth 20 lakhs seized near Shirpur Shirpur police action One arrested along Eicher 50 boxes found Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirpur: Police Inspector A along with the seized material and the suspect. S. Agarkar and Associates.

Dhule Crime News : शिरपूरजवळ 20 लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांची कारवाई

Dhule News : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणारा आयशर ट्रक शनिवारी (ता.२७) मध्यरात्री शिरपूर पोलिसांनी जप्त केला.

या कारवाईत सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मध्य प्रदेशातून शिरपूरमार्गे गुटख्याची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती.

त्यांच्या निर्देशानुसार, पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांनी सहकाऱ्यांसोबत कळमसरे शिवारातील शहादा फाट्यावर वाहनांची तपासणी सुरु केली. (Gutkha worth 20 lakhs seized near Shirpur Shirpur police action One arrested along Eicher 50 boxes found Jalgaon News )

रात्री सव्वादोनला संशयित आयशर ट्रक (यूपी ५३, इटी ०२४१) शिरपूरच्या दिशेने येत असताना पोलिसांनी तो अडवला.

घटनास्थळी ट्रकची तपासणी केल्यावर प्लॅस्टिक फिल्मच्या खोक्यांच्या आडोशाला १९ लाख ७४ हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू (गुटखा) आढळला.

गुटख्याची एकूण ५० खोकी जप्त करण्यात आली. संशयित चालक जमाल अली अहमद (वय ४८, रा.उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. ट्रकसह एकूण ३९ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, डी. बी. पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंके, प्रवीण गोसावी, होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी यांनी ही कारवाई केली.