Nandurbar Crime News : दोघे गुटखा तस्कर गजाआड; शहादा पोलिसांची कारवाई

Crime
Crimeesakal

Nandurbar News : महाराष्ट्रात वाहतूक व विक्री करण्यास प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला अवैधरीत्या शहाद्यात विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा तस्करांना शहादा पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून चारचाकी वाहनांसह सुमारे चार लाख ८२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. (Gutkha worth Rs 4 lakh 82 thousand seized nandurbar news)

ही कारवाई बुधवारी (ता. ३१) रात्री दहाला शहादा-तळोदा रस्त्यावर ठेंगचे गावानजीक करण्यात आली. या प्रकरणी नंदुरबार येथील विशाल मोहनदास जामनानी व सागर मोहनदास जामनानी या दोघांना अटक करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात तंबाखूमिश्रित गुटखा व सुगंधित पानमसाला वाहतूक व विक्रीस राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे. तरीदेखील मध्य प्रदेश व गुजरातमधून राज्यातून मोठ्या प्रमाणात या गुटख्याची तस्करी करून विक्री केली जात आहे. त्यामुळे गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून सातत्याने लावून धरली जात आहे.

पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. बुधवारी शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime
Kolhapur Crime : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या सांगलीच्या तरुणाचा कोल्हापुरात खून; डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार

त्यानुसार रात्री दहाला शहादा-तळोदा रस्त्यावर ठेंगचे गावानजीक उपनिरीक्षक छगन चव्हाण, गुन्हे शोधपथकाचे दिनकर चव्हाण, किरण पावरा, संदीप लांडगे, भरत उगले यांनी सापळा लावला असता त्यांना पांढऱ्या रंगाचे चारचाकी (एमएच ३९, एबी १९६०) वाहन येताना दिसले. त्या वाहनास थांबवून तपासणी केली असता प्रतिबंधित तंबाखूमिश्रित गुटखा व पानमसाला असल्याचे दिसून आले.

पोलिसपथकाने या वाहनातील सुमारे दोन लाख ८२ हजार ४८० रुपयांचा गुटखा व दोन लाख किमतीचे चारचाकी वाहन असा सुमारे चार लाख ८२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, नंदुरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतील विशाल मोहनदास जामनानी व सागर मोहनदास जामनानी या दोघा तस्करी करणाऱ्या बंधूंना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोलिस शिपाई दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अन्नसुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Crime News : मूत्रपिंड विकार झालेल्या पत्नीला घटस्फोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com