राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन 
पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच 
शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या त्यांच्या पश्‍च्यात तीन मुले असा परिवार आहे. नाशिक येथील कृषी पर्यवेक्षक उल्हास हनुमंतराव पवार यांचे ते वडील होत. 

प्राथमिक शिक्षकांसाठी कार्य 
राज्यातील प्राथमिक शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचेसोबत संपुर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला. हणमंतराव पवायांचे कार्य पाहुन त्यांची प्रथम 
पारोळा तालुका शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी निवडझाली शिक्षकांच्या समस्याविषयी जाण व ते सोडविण्यासाठी त्यांची तळमळ पाहुन त्यांची जळगांव जिल्हा प्राथ. शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली,त्या नंतर 
नाशिक विभागीयअध्यक्ष,तसेच जळगांव येथीलभव्य अधीवेशनात महाराष्ट्र राज्यशिक्षक संघाचेअध्यक्ष पदी त्यांची बिनविरोध निवड झाली.तसेच अखील भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या सचिव पदी निवड झाली व जळगांव जिल्हयातील संघटनेच्या इतीहासात मानाचा तुरा गोवला गेला त्याच्या काळात शिक्षकांचे विविध प्रश्न निकाली निघाले त्यात 
शिक्षकांना -बडकस आयोग,भोळे आयोग,त्रिस्तरीय वेतन श्रेणी,घरभाडे भत्ता,डीमट्रेंड वेतनश्रेणीसाठी पाठपुरावा,डिप्टीधारकांना डि.एड. वेतनश्रेणी मिळवून देणे,पाचवा वेतन आयोजज,प्राथ शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्या मुळेलागुकरण्यात 
आला आहे.त्यांनी शिक्षकांना आर्थिक स्थैर्यमिळवून देण्यासाठी जिल्हयातील 
जवळपास सभासदअसलेल्या सरकारी नोकरांच्या सहकारी (ग.स.) सोसायटीचे त्यांनी स्वतः लोकमान्य पॅनलचीनिर्मिती केली त्यांची 
चेअरमनपदी निवड झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hanmant pawar ded