दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील हस्ती परिवार बांधिलकी, नीतिमूल्ये, प्रामाणिकता, सचोटी, विश्वासपूर्ण पारदर्शी व्यवहार के. एस. ग्रुपद्वारे करीत आहेत. यात हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट व हस्ती पब्लिक स्कूल, हस्ती बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन-मंगल कार्यालयाची भर पडली आहे. यात बांधिलकीचे कार्य जोपासत राज्य कार्यक्षेत्र असलेल्या हस्ती को-ऑप. बँकेने ग्राहकांच्या विश्वासातून साधलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे.
- निखिल सूर्यवंशी, धुळे