जळगाव- शहरासह जिल्ह्यात आजच्या तापमानाने ३७ अंशांचा टप्पा गाठला आहे. रविवार असल्याने व उन्हाची तीव्रता असल्याने दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. होळीपूर्वीच मार्चच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असते. मात्र, यंदा अवकाळी पाऊस झालेला नसला तरी मध्यंतरी काहिसे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानात बदल झाला. आगामी दोन दिवसांत तापमानाचा पारा ४२ अंशांवर जाणार असल्याचे सांगण्यात आले.