जळगाव- भारतात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी, रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव. होळीसाठी लागणारे हार-कडे बनवून त्याची विक्री करण्यास वेग आला आहे. .जळगाव शहरात अमळनेर येथील मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना सोबत घेत होळी, गुढीपाडव्यासाठी लागणारे हार-कडे तयार करीत आहेत. यामुळे मुस्लिम-हिंदू बांधव एकत्र येत होळीचा गोडवा अधिकच वाढवत असल्याचे चित्र आहे..यंदा साखरेच्या दरात वाढ झाल्याने हार-कड्यांचे दरही वाढले आहेत. गतवर्षी १४० रूपये किलो मिळणारे हार-कडे १६० रूपये किलोने उपलब्ध आहेत. येत्या गुरुवारी (ता.१३) होळी आहे. होळीला साखरेचा हार घालून पूजा केली जाते. लहान मुलींना साखरेचा हार, तर मुलांना साखरेचे कडे दिले जाते. गुढीपाडव्याला गुढीला साखरेचा हार-कडे घातले जाते. हार-कड्यांचा दर सध्या १५० ते १६० रुपये किलो आहे. साखर, कोळसा, दोरा, मजुरीचे दर वाढल्याने हे दर वाढले आहे. होलसेलचे दर ९० ते ९६ रुपये किलो आहेत. .अमळनेर येथील अजिज करीम हलवाई यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासत आहे. हार-कडे बनविण्याचा त्याचा छोटा व्यवसाय हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक आहे. हा परिवार सात पिढ्यांपासून मिठाई व्यवसायात आहे. अजीजभाई यांच्या पणजोबांपासून हा व्यवसाय सुरू आहे..व्यवसायाची परंपरा त्यांचे आजोबा अमीरभाई यांनी जोपासत त्यापाठोपाठ वडील करीमभाई यांनी व्यवसायात प्रगती केली. अजीजभाई यांना दोन मुले नासीर व आदिल, नातू अझरही मदत करतात. अजीज हलवाईवाले २७ वर्षांपासून येथील कासमवाडीत न्यू मीलन हार-कडे नावाने कारखाना महिनाभरासाठी जळगावमध्ये उभारतात. एका महिन्याला एक हजार किलोचा माल येथे तयार होतो. हा माल इतर व्यापारी नेऊन त्याची विक्री करतात..हिंदू-मुस्लिम कारागीर एकत्रअजrजभाई यांच्या छोटाशा व्यवसायात हिंदू, मुस्लिम, आदिवासी मजूरही काम करतात. त्यात नंदुरबार, प्रकाशा, तोरणमाळ येथील कारागीर कार्यरत आहेत. त्यात राम भिल, देवा चौधरी, तुळशीराम आदिवासी, राजू आदिवासी, रावशा आदिवासी आदींचा समावेश आहे. जातीभेद न मानता ते एकत्र काम करतात. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.