
Nandurbar News: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; गुजरातच्या महिलेला परत दिला लाखांचा ऐवज!
नंदुरबार : गुजरात राज्यातून आलेल्या महिलेची रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असलेली पर्स रिक्षात विसरून गेल्यानंतर रिक्षाचालकाने ती सांभाळून ठेवली. संबंधित महिला पोलिस पथकासह रिक्षा चालकाचा शोध घेत त्याच्यापर्यंत पोहोचली तेव्हा प्रामाणिकपणा दाखवीत रिक्षाचालकाने त्या महिलेला पोलिसांसमक्ष ती पर्स परत केली.
त्यामुळे पर्स हरविल्याच्या भीतीने चेहरा फिक्का पडलेल्या महिलेचा चेहरा आनंदाने फुलून गेला. रिक्षा चालकाच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्याला कार्यालयात बोलावून त्याचा सत्कार केला. (Honesty of Rickshaw Driver money returned to woman of Gujarat Nandurbar News) v
रूपाली रामचंद्र धनगर ( रा. उधना, सुरत) आज (ता.२१) या गुजरातमधून त्यांच्या पतीसह नंदुरबार येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या नंदुरबार बस स्थानकावर आल्या. तेथून एका रिक्षात बसून करण चौफुली येथे गेल्या. तेथे रिक्षातून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षा चालकास भाड्याचे पैसे दिले. त्यानंतर रिक्षा चालक तेथून निघून गेला.
काही वेळातच रूपाली धनगर यांचे रिक्षात पर्स राहिल्याचे लक्षात आले. पर्समध्ये तीन हजार रुपये रोख व १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत होती. महिलेने पतीसह तत्काळ नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठले. तेथे असलेले वसंत वसावे यांना हकिगत सांगितली. श्री. वसावे यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाणेचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते यांना कळविली.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
हेही वाचा: Citylinc Fare Hike News : नववर्षाच्या सुरवातीला शहर बस दरात एवढी वाढ होणार! जाणुन घ्या
त्यावर श्री. मोहिते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी, सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ नंदुरबार शहर पोलिस ठाणेचे सहा. पोलिस उप निरीक्षक कृष्णा पवार, बलविंदर ईशी, स्वप्नील शिरसाट, अफसर शहा हे रिक्षा स्टॉपवर गेले. डिएसके मार्केटचा सीसीटिव्हीची पाहणी केली. ती रिक्षा निष्पन्न झाली. रिक्षेचा शोध घेतला असता ती रेल्वे स्टेशन परिसरात मिळाली.
रिक्षा चालकास महिलेच्या पर्सबाबत विचारताच पर्स सांभाळून ठेवल्याचे सांगितले. महिलेने समक्ष पाहणी केल्यावर पर्समधील वस्तू सुस्थितीत मिळून आले. रिक्षाचालक देवेंद्रसिंग राजूसिंग परदेशी, (रा. परदेशीपुरा, नंदुरबार) यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा: NAREDCO Homethon 2022 : आजपासून ‘होमथॉन २०२२’ नाशिककरांसाठी खुले!