हाॅटेल मालकावर शिंदखेड्यात चाकूने हल्ला | crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attack

हाॅटेल मालकावर शिंदखेड्यात चाकूने हल्ला

चिमठाणे (जि. धुळे) : शिंदखेडा शहरातील वरपाडा चौफुलीवर बुधवारी (ता. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास राज हाॅटेलच्या मालकाला चार जणांनी चाकूने भोसकले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्यानेच केला काकाचा खून

भूषण जयवंत पाटील (वय ३४ ) पाटण गावशिवारातील पेट्रोलपंपाच्या बाजूस असलेली हाॅटेल राज गार्डन येथून घरी येत होता. वरपाडा चौफुलीजवळ अनिल पिंपळे, गणेश भील व त्यांच्या दोन साथीदारांनी भुषणची दुचाकी थांबविली व तीन महिन्यांपूर्वी हाॅटेलमध्ये बसू न दिल्याबाबत विचारले. हाॅटेलमध्ये येणाऱ्या ज्ये नागरिकांना तुम्ही मारहाण करतात. त्यामुळे तुम्हास माझ्या हाॅटेलमध्ये जेवणास मनाई केली, असे भूषणने सांगितले. त्याचा राग आल्याने संशयित अनिलने चाकूने भूषणच्या कमरेचा वार करून गंभीर दुखापती केली.

गणेश भील इतर दोघांनी भूषणला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यादरम्यान नीलेश निकम व उमेश भदाणे धावत आल्याने आणि गर्दी जमा होत असल्याने त्या चौघांनी तेथून पळ काढला. भूषणला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे मेडिकल काॅलेज मध्ये हलविले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक रवींद्र केदार तपास करीत आहेत.

हेही वाचा: Dhule : तशा ‘मेसेजेस’पासून दूरच राहा पोलिस अधीक्षक पाटील यांचे आवाहन

Web Title: Hotel Owner Seriously Injured Due To Attack 4 People With A Knife In Shindkheda In Dhule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top