गावकऱ्यांतर्फे निवृत्त लष्करी जवानाचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा!

गावकऱ्यांतर्फे निवृत्त लष्करी जवानाचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा!

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रूणमळी (ता.साक्री) येथील रहिवासी व लष्करातील जवान संदीप दादाजी पवार नुकतेच अठरा वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.18) सायंकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. ग्रामपंचायत चौकात झालेल्या भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्यात त्यांचा ग्रामस्थांनी कुटुंबियांसह सपत्नीक सत्कारही केला. यावेळी पवार यांना गहिवरून आले होते. नाशिकचे कर्नल सुधाकर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

बालपणीच पितृछत्र हरपलेल्या पवार यांच्या मातोश्री मंगलाताई पवार, पत्नी कविता पवार यांच्यासह नाशिकचे अभियंता संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, देशमुख, जितेंद्र पाटील, चंद्रशेखर भदाणे, प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ.पी.एस.सोनवणे, माजी प्राचार्य बी.एम.भामरे, आनंद पाटील, अंनिस कार्यकर्ते पी. झेड. कुवर, दीपक नांद्रे, प्रवीण पाटील, बाळूशेठ विसपुते, देवराम पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व भारतमातेच्या प्रतिमेसह शिवरायांच्या मूर्तीपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर विविध राजकीय, सामाजिक संघटनांसह रूणमळी ग्रामस्थांतर्फे पवार व त्यांच्या कुटुंबियांचाही भव्य नागरी सत्कार झाला. याप्रसंगी निवृत्त जवान संदीप पवार, भीमराव गरुड, कर्नल सुधाकर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थी अनुराग जगदाळेने "संदेसे आते है" व "मेरा रंग दे बसंती चोला" ही देशभक्तीपर गीते सादर केली. निवृत्त जवान संदीप पवार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात कर्नल सुधाकर पाटील यांनी युवकांना भारतीय सैन्य दलात सामील होण्याचे भावनिक आवाहनही केले.

डॉ.विपीन पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप पवार, चंद्रकांत पवार, प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे, संजीवन पवार, कुंदन वेंडाईत आदींसह तरुण कार्यकर्ते व रूणमळी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थांसह तरुण, लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

"घर सोडून लष्करात मातृभूमीची सेवा करताना जन्मदात्रीचा त्यागही आठवत होता. घरची परिस्थिती बेताची, त्यातही बालपणीच पितृछत्र हरपल्याने दुःखाचा आघात झाला. कुटुंबियांसह आई व पत्नीच्या पाठिंब्यामुळेच इतकी वर्षे मातृभूमीची प्रामाणिकपणे सेवा करू शकलो. आगामी काळात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू."
संदीप दादाजी पवार- निवृत्त लष्करी जवान, रुणमळी ता.साक्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com