Dhule : सतत होणाऱ्या पावसामुळे घराची पडझड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wall of Vijay Koli's house collapsed

Dhule : सतत होणाऱ्या पावसामुळे घराची पडझड

न्याहळोद (जि. धुळे) : परिसरात पावसाची (Rain) संततधार सुरु असून एकीकडे शेतकरी पेरणीची लगबग तर दुसरीकडे शेतमजुरांच्या घराची पडझडीमुळे शेतमजूर बेघर झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसापासून मध्यम ते जोरदार होत असलेल्या पावसामुळे मातीच्या घराची पडझड (Collapsed) होत असून, येथील शेतमजूर विजय सोमा कोळी यांच्या घराची भिंत कोसळून गॅस भांडी भिंतीखाली दाबल्यामुळे कोळी परिवार उघड्यावर आला आहे. रात्र कशी निघेल या विवंचनेत कोळी परिवार चिंतामग्न आहे. (house collapsed due to continuous rains Dhule News)

एकीकडे शासन सांगते की प्रत्येकाला पक्के घर बांधून मिळेल परंतु येथे वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ज्या लाभार्थ्याला खरी गरज आहे त्यांना मात्र बेघर, ज्यांना आवश्यक नाही अशांना घराचा लाभ मिळाला आहे. काहींना घरे आहेत, परंतु राहायची सोय नाही काहींना तर घरच नाहीत अशी परिस्थिती परिसरात दिसून येत आहे. ग्रामपंचायतीला वेळोवेळी पाठपुरावा करूनही घरकुल योजनेत सामावून घेण्याची मागणी केली. लाभार्थी असूनही पक्के घर मिळत नसल्याची तक्रार विजय कोळी यांनी केली आहे.

Web Title: House Collapsed Due To Continuous Rains Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top