लासलगाव-‘पाणी पाजण्यासारखे पुण्य नाही’ असे आपण नेहमी म्हणतो, पण आजच्या काळात पाण्यावरही व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, काही लोक समाजासाठी नि:स्वार्थी सेवा देत उदाहरण घालून देतात. .लासलगावच्या अशाच एका समाजसेवी मुस्लिम गिरणी चालकाने गेल्या १४ वर्षांपासून नागरिकांसाठी विनामूल्य शुद्ध आणि थंड पाण्याचा उपक्रम राबवला आहे. लासलगावमधील लोकनेते दत्ताजी पाटील बँकेसमोर शकील अब्दुल गफूर मोमीन भारत फ्लोअर मिल, पिठाची गिरणी या नावाने गिरणीचा व्यवसाय सांभाळत आहेत. .परिसरात दोन महाविद्यालये आणि बसस्थानक असल्याने शेकडो विद्यार्थी, प्रवासी आणि व्यापारी रोज पाण्यासाठी वणवण करत असतानाच दिसत होते. ही समस्या लक्षात घेऊन शकील मोमीन यांनी स्वतःच्या कमाईतून तीन लाख रुपये खर्च करून गिरणीतच फिल्टर प्लांट आणि थंड पाणी मशिन बसवले. समाजासाठी प्रेरणादायी.आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणी कोणासाठी थांबत नाही, मात्र शकील मोमीन यांचा हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज अधिक जाणवते. समाजातील इतरांनीही असे समाजसेवेचे पाणीदार उपक्रम राबवावेत, असे आवाहन नागरिक करत आहेत..दररोज २५०-३०० रुपयांचा खर्चपिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसतानाही, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये मोमीन दररोज २५०-३०० रुपयांचे १५०० लिटर पाणी विकत घेऊन ७००-८०० विद्यार्थी आणि नागरिकांना मोफत पुरवत आहेत. काही वर्षांपूर्वी दोन-चार पाण्याच्या बाटल्या ठेवत होतो. मुख्य रस्त्यावर असल्याने अनेक विद्यार्थी पाणी पिण्यासाठी येत. नंतर पाणी कमी पडू लागल्याने मोठ्या टाक्या बसविल्या आणि फिल्टर प्लांट उभारला. यात कोणताही स्वार्थ नाही, फक्त समाधान आहे, असे शकील मोमीन यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.