Dhule Crime News : अवैध गोमांस वाहतूक सोनगीर येथे पकडली

Cow News
Cow Newsesakal
Updated on

Dhule Crime News : मुंबई-आग्रा महामार्गावरील येथील टोलप्लाझावर जनावरांचे मांस अवैधरीत्या वाहतूक व विक्रीसाठी नेणाऱ्या एका टाटा ४०७ वाहनास गोरक्षकांनी पकडले. अडीच लाख रुपयांचे अडीच टन मांस तसेच अडीच लाखांचे वाहन असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.( Illegal beef traffic caught in Songir dhule crime news)

धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा वाहन (एमएच ३४, २५७८) यात जनावरांचे मास अवैधरीत्या वाहतूक व विक्रीस जात असताना गोरक्षकांनी रोखून पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी संशयित चालक शेख शोएब शेख अख्तर (वय २२, रा. सिल्लोड, स्नेहनगर, जि. औरंगाबाद) व शेरखाँ खलीलखाँ पठाण (३४, रा. अशरफनगर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे), रोशन कुरेशी, पप्पू कुरेशी (दोघे रा. दोंडाईचा) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Cow News
Dhule Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थ्याची तापी नदीत आत्महत्या

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिस नाईक ईश्वर सोनवणे, पोलिस शिपाई संजय जाधव, विजयसिंग पाटील तपास करीत आहेत.

Cow News
Dhule Crime News : अपघाताचे कारण देत ऑइल विक्री; टँकरचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

बनावट प्रमाणपत्राद्वारे अडीच कोटींचा परकीय चलन घोटाळा उघड मुंबईतील सीएवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल वाशीतील सी-फूड कंपनीला परदेशात निधी पाठविण्यास बेकायदेशीर मदत करणे सीएला पडले महागात
A viral video from Ujjain allegedly shows a transgender Aghori practitioner near a burning funeral pyre
Cattle Rescue
baramati traffic police recovered 17 stolen motorcycles fake number plate
Marathi News Esakal
www.esakal.com