जळगाव- नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध घरगुती गॅस सिलिंडरमधून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरून दिला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हेशाखा, नशिराबाद पोलिस पथकाने छापा टाकून संशयिताकडून १८ गॅस सिलिंडरसह इतर ४ लाख ९६ हजार १५० रुपयांचे साहित्य जप्त केले असून, नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.