शहादा- सध्या रब्बी हंगामातील पीक काढणीला वेग आला आहे. ग्रामीण भागात अनेक मोठ्या गावांमध्ये बेकायदेशीर धान्य खरेदी केंद्र अवैधरीत्या सुरू केले. शेतकऱ्यांचा उत्पादित माल या केंद्रांवर किरकोळ स्वरूपात घेतला जातो. उत्पादित मालाला भावही कमी मिळतो. शिवाय, फसवणुकीचा प्रकारही घडू शकतो. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळीच पुढाकार घेऊन विनापरवाना धान्य खरेदी करणाऱ्यांना लगाम लावून शेतकऱ्यांची भविष्यात होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.