पाचोरा- तालुक्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांतील पाण्याचा अवैध उपसा दिवसागणिक वाढतच आहे. या प्रकल्पांवर अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी यानिमित्त केली जात आहे. तालुक्यातील धरणे, पाझर तलाव व सार्वजनिक जलस्त्रोतांतून परिसरातील अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी व शेतीपूरक व्यवसायासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी करीत आहेत.