भाजलेल्या शिवमला जैन ट्रस्टचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivam

भाजलेल्या शिवमला जैन ट्रस्टचा आधार

धुळे : खेमसेवाडी (जि. पुणे) येथील दत्तात्रय खेमसे यांचा तीन वर्षांचा शिवम कुटुंबीयांची नजर चुकवून स्वयंपाकघरात शिरला अन् तेथे धक्का लागून चुलीवरील आमटीचे पातेले त्याच्या अंगावर पडले. यात तो ५० टक्के भाजला गेला. त्याच्या उपचाराचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर होता. अशावेळी जैन ट्रस्टने शिवमच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आणि अडीच लाख रुपयांची भरीव मदत उपलब्ध केली.

दारिद्रयरेषेखालील व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार पेलण्यासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केले असल्या, तरी विविध कारणांनी अनेक जणांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्वरित उपचारांची निकड, शासकीय सवलत पदरी पाडून घेण्यासाठी हवे असलेले योग्य मार्गदर्शन, विशिष्ट हॉस्पिटल किंवा तज्ज्ञ डॉक्टरांवरील विश्‍वास, नातेवाइकांचा सल्ला, असे अनेक अडसर गरजू रुग्णांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित करतात. अशा अडीअडचणी जमेस धरून पुण्यातील समवेदना सारख्या सामाजिक संस्था देणग्या संकलित करून गरजूंना सहकार्य करतात. सह्याद्री हॉस्पिटलसारखे नामांकित हॉस्पिटल्स त्यांच्या या उदात्त कार्यात सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर समवेदना संस्थेचे कार्यकारी अधिकारी अमर पवार यांनी २० मेस जैन ट्रस्टला शिवमच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील उपचारासाठी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. खेमसे कुटुंबीयांतर्फे श्री. पवार यांनी आवश्यक कागदपत्रे (कै.) रतीबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टला उपलब्ध करून ट्रस्टकडून अनामत रक्कमेपोटी अडीच लाख रुपये पाठविण्याची विनंती केली.

हेही वाचा: धुळे : लग्न सोहळ्याच्या 20 तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

जैन ट्रस्टकडून मदत

शिवमच्या उपचारासाठी मदतीचा प्रस्ताव आल्यानंतर प्रा. डॉ. न. म. जैन यांनी ट्रस्टच्या विश्‍वस्तांशी त्वरित संपर्क करून समवेदना संस्थेच्या खात्यात आरटीजीएसद्वारे अडीच लाख रुपये जमा केले. दरम्यान, अशा कामांसाठी ट्रस्ट केवळ निमित्तमात्र आहे. खरे श्रेय जैन ट्रस्टच्या देणगीदारांचे असल्याच्या भावना ट्रस्टचे प्रभारी कार्यकारी विश्‍वस्त प्रा. डॉ. संजीव जैन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: चिमुकल्यांच्या भेटीनं मुक्ता भारावली! ‘वाय’ चा अनोखा पाहुणचार

Web Title: Jain Trust Help For Treatment Of Burned Shivam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dhule
go to top