Agriculture
sakal
उत्तर महाराष्ट्र
Agriculture News : जळगावच्या शेतीला 'ड्रोन'चे पंख! ५५ लाखांचा निधी मंजूर, ११ शेतकरी कंपन्यांशी करार
Jalgaon Zilla Parishad Boosts Hi-Tech Farming with Agri-Drone Subsidy : जळगाव जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर मंजूर करण्यात आलेले कृषी ड्रोन शेतकऱ्यांना आधुनिक व अचूक फवारणी सेवा देणार आहेत.
जळगाव: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ५५ लाख रुपयांचा निधीतून जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्यांना फवारणी ड्रोन मंजूर करण्यात आले आहे. इतकेच नाही तर या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अर्थात यामुळे हायटेक फवारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
