जळगाव: शहरात अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. तीन झोनमध्ये भूमिगत गटारींचे काम होणार असले तरी या काही महिन्यांपूर्वीच या झोनमध्ये काँक्रिट व डांबरी तयार झालेले रस्ते पुन्हा खोदले जाणार आहे. त्यामुळे शासनाने रस्त्यांवर खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी यामुळे वाया जाणार असल्याचे बोलले जात आहे.