Ayushman Bharat
sakal
उत्तर महाराष्ट्र
Jalgaon News : जळगावच्या १६ हजार ज्येष्ठांना 'वय वंदना'चे कवच; ७० वर्षांवरील सर्वांना मोफत उपचार!
Registration Drive in Jalgaon District : जळगाव जिल्ह्यात ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'आयुष्मान वय वंदना कार्ड' नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून, याद्वारे मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जळगाव: मोठ्या दवाखान्यांमध्ये मोफत उपचार करता यावा, यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड मिळाले आहे. आता याच लाभार्थ्यांमधील ७० वर्षांवरील लाभार्थ्यांना ‘वय वंदना कार्ड’ तयार केले जात आहेत. जिल्ह्यातील असे साधारण १६ हजार ५९१ लाभार्थ्यांची कार्ड तयार झाली आहेत.
