Girish Mahajan : जळगाव महापालिकेत यंदा भाजप 'रेकॉर्ड ब्रेक' कामगिरी करणार; विरोधी पक्षात कोणी उरले नाही: गिरीश महाजन
Girish Mahajan Predicts Record Victory in Upcoming Municipal Elections : जळगाव येथील जी. एम. फाउंडेशनमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन करताना जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप 'रेकॉर्ड ब्रेक' कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
जळगाव: विरोधी पक्षातील मातब्बर नेते हे आता भारतीय जनता पक्षात आल्याने आमची ताकद अजून वाढली आहे. त्यामुळे विरोधी पक्षात आता कोणी उरलेले दिसून येत नाही. मागील निवडणुकीत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले होते.