जळगाव- अर्धसैनिक बलाच्या कौटुंबिक तक्रार प्रकरणी दाखल गुन्ह्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणातील पोलिस कर्मचारी रवींद्र प्रभाकर सोनार (वय ४६) व धनराज नारायण निकुंभ (वय ४४) या दोघांची सोमवारी (ता. १४) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात आणण्यात आले.