Cotton
sakal
जळगाव: जिल्ह्यात गेल्या महिन्याच्या दहा तारखेपासून ‘सीसीआय’तर्फे काही ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र, ‘सीसीआय’च्या जाचक अटींमुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांकडून एका एकरातून केवळ पाच क्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. सोबतच ऑनलाइन नोंदणी अट, स्लाट पद्धत आदींमुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.