Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

Cotton Arrivals Decline in Jalgaon Market : जळगाव जिल्ह्यातील एका जिनिंग प्रेसिंग मिलमध्ये साठवून ठेवलेल्या कापसाच्या गाठी. केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे देशी कापसाला भाव मिळेनासा झाला असून उत्पादनात मोठी घट झाली आहे.
Cotton Market

Cotton Market

sakal

Updated on

जळगाव: यंदा खरिपात अतिवृष्टीने कापसाचे झालेले कमी उत्पादन, व्यापाऱ्यांकडून मिळणारा अल्पभाव आदी कारणांमुळे बाजारात कमी प्रमाणात कापूस विक्रीस आला. गेल्या आठ दिवसांपासून कापूस बाजारात विक्रीला येणे बंद झाल्याने कापूस हंगाम संपल्याचे अप्रत्यक्षरित्या दिसून येत आहे. कापसाला खासगी व्यापाऱ्यांकडे ७,२०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव आहे. ‘सीसीआय’नेही केंद्रांवरील कापूस खरेदी थांबविली आहे. कापूस बाजारात नसल्याने जिनिंगचालकांकडील गाठींचे उत्पादनही थांबले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com