जळगाव: जिल्ह्यात यंदा सात लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे. असे असले तरी ‘पांढरे सोने’ असलेल्या कापूस लागवडीत दीड लाख हेक्टरची घट झाली आहे. दुसरीकडे आर्थिक स्थैर्य देणाऱ्या मका, सोयाबीनची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या वर्षीपर्यंत कापसाला व्यापाऱ्यांसह ‘सीसीआय’ने कमी दर दिला होता. यंदा मात्र ‘सीसीआय’कडून आठ हजार शंभर रूपये प्रतिक्विंटल शेतकऱ्यांच्या कापसाला भाव दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.