जळगाव: आमच्या खात्यात कोठून तरी रक्कम आलीय, कोणाची आहे माहिती नाही. ऑनलाइन खात्यात आल्याचा बनाव करणारे जळगावचे तरुण दुबई-कंबोडिया येथून ऑपरेट होणाऱ्या सायबर टोळीसाठी बँक खाते भाड्याने देऊन कमिशन घेत असल्याचे उघडकीस आले आहे. जळगाव सायबर पोलिस ठाणे आणि वांद्रे पोलिसांनी या दोघा तरुणांच्या कृत्याचा भांडाफोड करून त्यांना दीड कोटींच्या ऑनलाइन फसवुणकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. रोहित संजय सोनार (वय ३३) व हितेश हिंमत पाटील (वय ३३, दोन्ही रा. म्युनसिपल कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.