Women Leadership
sakal
जळगाव: जिल्ह्यातील पालिकांना आता चार-पाच वर्षांनी नवीन पदाधिकारी, कारभारी मिळाले आहे. जिल्ह्यात झालेल्या पालिका निवडणुकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नारीशक्तीचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित केले आहे. जिल्ह्यातील १८ पालिकांपैकी तब्बल १२ पालिकांच्या नगराध्यक्षपदी महिलांची निवड झाली आहे. सहा ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी मिळाली आहे. हा निकाल महिलांच्या नेतृत्वक्षमतेवर दाखविलेला विश्वास असल्याचे बोलले जात आहे.