sakal E-Bus Servic
उत्तर महाराष्ट्र
Jalgaon News : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला ग्रीन सिग्नल; जळगावात ५० ई-बसेस लवकरच रस्त्यावर
Jalgaon E-Bus Service to Begin in October : ई-बससेवेचा १५ ऑगस्टचा मुहूर्त चुकणार आहे. आता हे काम ८० टक्के पूर्ण झाल्यावर महापालिका कंपनीशी करारनामा करणार असून, ऑक्टोबरमध्ये बससेवेला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी चिन्हे आहेत
जळगाव- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई-बससेवा योजनेंतर्गत शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा मंजूर झाली आहे. ही बससेवा महापालिकेच्या माध्यमातून शहरात राबविली जाणार असून, बस आगाराचे काम ६५ ते ७० टक्के झाले आहे. अद्याप काम अपूर्ण असल्याने ई-बससेवेचा १५ ऑगस्टचा मुहूर्त चुकणार आहे. आता हे काम ८० टक्के पूर्ण झाल्यावर महापालिका कंपनीशी करारनामा करणार असून, ऑक्टोबरमध्ये बससेवेला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी चिन्हे आहेत.
