जळगाव: पायी जाणाऱ्या वृद्धाला ‘बाबा, कारमध्ये बसा.. पुढच्या चौकात सोडतो’, असे सांगत शेजारील सीटवर बसलेल्यांनी त्यांच्या खिशातून २५ हजारांची रक्कम चोरल्याची घटना (ता.१) कालिंका माता चौफुली ते अजिंठा चौकादरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित दोघा संशयितांना अटक केली आहे.