land scam
sakal
जळगाव: शहरातील एका शेतकरी कुटुंबाला आर्थिक अडचण असताना, व्याजाने पैसे देऊन त्या मोबदल्यात अंदाजे तीन कोटी रुपयांची असलेली २१ बिघे जमीन ३० लाख रुपयांत नावावर करून घेतली. पैसे परत केल्यानंतरही जमीन परत मिळाली नाही. या सावकारीबाबत शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. त्यावरून संबंधिताच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने गेल्या आठवड्यात छापा टाकला होता. तेथे तीन सौदा पावत्या व नऊ खरेदीखते संशयास्पद आढळली आहेत.