जळगाव- खते व बियाण्यांवर लिकिंग कराल, तर खबरदार, तुम्हाला लिंक करू, शेतकरी तुमच्या कंपनीवर मोर्चे घेऊन येतील, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.१६) खरीपपूर्व हंगाम बैठकीत दिला. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.