जळगाव: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी असताना शहरात गणपती मूर्तींसह सजावटीला लागणाऱ्या साहित्याची दुकाने उभारणी जोरात सुरू झाली आहे. मुख्य बाजारपेठ, रिंग रोड, टॉवर चौक, नेहरू चौक, जिल्हा पेठ, मू. जे. महाविद्यालय रस्ता यांसारख्या ठिकाणी गणेशमूर्तींची दुकाने, सजावटीच्या साहित्यांसह ‘लायटिंग’चे स्टॉल थाटले जात आहेत.