Crime
sakal
जळगाव: गोलाणी मार्केट परिसरात भरदिवसा झालेल्या खुनाच्या घटनेत प्रेमप्रकरणाची पार्श्वभूमी उघडकीस आली आहे. मारेकरी शुभम सोनवणे याची मैत्रीण साई गणेश गोराडे-पाटील ऊर्फ जय याच्या वर्गात शिक्षण घेत होती. दोघांचे नियमित बोलणे होत असल्याने शुभमला त्या दोघांत प्रेमसंबंध असल्याचा संशय बळावला होता. त्यातूनच गेल्या सहा महिन्यांपासून तो साई (जय) याला धमकावत असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद आहे.